मनपाच्या चुकीच्या कारवाईने सिंहगड रोडवरल  नेटवर्क सेवा ठप्प, विद्यार्थांना नाहक त्रास 

महावार्ता न्यूज: पुणे महापालिकेने परवानगी असताना चुकीची कारवाई करून ऑप्टिक फायबर केबल कापून टाकल्याने संपूर्ण सिंहगड रोड परिसर बाधित झाला आहे सर्वसामान्य ग्राहकांसह दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसंच नीट सारख्या प्रवेश परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थाना नाहक त्रास होत आहे  

पावसाने सर्व पुण्यात पाणी तुंबल्याने सर्वसामान्य पुणेकरांना मनसस्ताप झाला तसेच नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर आला. महापालिकेने सिंहगड रोड परिसरात युटिलिटी लाईन मध्ये केबल सापडल्याचे सांगून संबंधित कंपन्यांच्या केबल कापून टाकण्याचे आदेश दिले परंतु शहानिशा केला असता स्वतः महापालिकेने 2014 मध्ये परवानगी दिल्याचे आढळून आले. यामध्ये मोबाईल कंपन्या ,महावितरण , अशा कंपन्यांची केबल आढळून आली. मात्र महापालिकेने कारवाई करून ऑप्टिक फायबर केबल कापून टाकल्याने संपूर्ण सिंहगड रोड परिसर बाधित झाला असून सर्वसामान्य ग्राहकांचे विशेषतः नुकत्याच दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसंच नीट सारख्या प्रवेश परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थाना अतिशय त्रास होत आहे .

मोबाईल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार तसेच सादर केलेल्या परवानगीनुसार महापालिकेने 2014 साली संबंधित परवानगी दिली होती तसेच मोबाईल कंपन्यांकडून संबंधित परवानगीनुसार काम केल्याचे सांगण्यात आले . यामध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले गेले नसल्याचा दावा कंपन्यांकडून केला गेला. ऑप्टिक फायबर च्या तिप्पट व्यासाच्या महावितरण च्या केबल असूनही त्यांच्यावर कारवाई नाही मात्र मोबाईल च्या केबल कापल्याने सर्वसामान्य ग्राहकांना हकनाक त्रास होत आहे.

महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तसंच संबंधित पथ विभाग आणी अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सादर केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व रीतसर परवानग्या सादर केल्या. यावेळी मोबाईल ऑपरेटर्स कडून विविध मागण्या केल्या असून महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते . महापालिकेने संबंधित विभागाला मोबाईल ऑपरेटर्स ला नेटवर्क सुरळीत ठेवण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले .

ऑपरेटर्स च्या मागण्या :
संबंधित डकट ची पालिका आणि ऑपरेटर्स कडून संयुक्त सर्वेक्षण करावे आणि नेटवर्क रिस्टोर करन्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा ऑपरेटर्स नि व्यक्त केली . डकत चा नकाशा सुद्धा महापालिकेने पडताळून पाहावा यामुळे सादर लाईन हि ड्रेनेज लाईन आहे की सेवा वाहिन्यांसाठी आहे याचा उलगडा होईल आणि भविष्यात अशी समस्या उद्भवणार नाही तसंच लवकरात लवकर नेटवर्क रिस्टोर करून सर्वसामान्य मोबाईल ग्राहकांना दिलासा द्यावा अशी विनंती यावेळी मोबाईल ऑपरेटर्स कडून करण्यात आली . महापालिका अधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा रीतसर विचार करण्याचे आश्वासन दिल्याने मोबाईल कंपन्यांना दिलासा मिळाला आहे .

See also  मामासाहेब मोहोळ स्मरणार्थ महाराष्ट्र केसरीचे गदेचे पुण्यात पूजन, 1983 पासून मोहोळ कुटुंबियांकडून देण्यात येते मानाची गदा