


पिरंगुट : लवळे फाटा येथील अमराळे ज्वेलर्स यांच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
विश्वासाने खरेदी करावे असे सुवर्ण दालन असलेल्या आपल्या मुळशीकरांचे हक्काचे आणि आवडते अमराळे ज्वेलर्सच्या हळदी कुंकू समारंभाला तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. मुळशी तालुक्यातील बाळासाहेब अमराळे यांनी पुण्यानंतर अमराळे ज्वेलर्सची मुळशीत शाखा सुरू केली. विश्वसनीय ज्वेलर्स म्हणून मुळशीत अमराळे ज्वेलर्स नावाजले असल्याने व ग्राहक आणि अमराळे ज्वेलर्स चे असलेले जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नातेहे उपस्थित राहिलेल्या असंख्य महिलांच्या गर्दी मधून दिसून आले. या प्रसंगी आलेल्या सर्व महिलांना चांदीची एक फ्रेम भेटवस्तू म्हणून देण्यात आली तसेच उत्कृष्ट पारंपारिक वेशभूषा परिधान करून आलेल्या सुजाता बीश्वास यांना एक चांदीचे पैंजण भेट देण्यात आले.














