


अहिल्यानगर ः मुळशीचा ढाण्या वाघ, पुणे जिल्ह्याचा कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा मम पृथ्वीराज मोहोळ ठरला.
गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात तांत्रिकच्या आधारे 2-1 गुणाने पृथ्वीराज याने सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड याच्यावर विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड ठरला. विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि थार चारचाकीची चावी प्रदान करण्यात आली















