मुळशीत राष्ट्रवादीला भगदाड – पांडूरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, अमित कंधारे, सुरेश हुलावळेंचा भाजपात प्रवेश

महावार्ता न्यूज: माजी आमदार संग्राम थोपटेंच्या यांच्या साक्षीने मुळशीतील राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे 4 दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. .यात मुळशीतील माजी सभापती पांडूरंग ओझरकर, पीएमआरडीए सदस्य सुखदेव तापकीर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे, राष्ट्रवादीचे नेते सुरेश हुलावळे यांच्यासह हिंजवडीतील माजी सरपंचांचा समावेश आहे.
मुंबईत भाजपा मुख्यालयात सकाळी मुळशीतील नेते व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रदेश केला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्वाती हुलावळे, हिंजवडीचे माजी सरपंच विक्रम साखरे,
पांडूरंग राक्षे, मोरेश्वर घारे, यांच्यासह 50 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.
See also  मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या श्रावणीचा डबल धमाका