प्रकाश भेगडेंचे उपक्रम लय भारी, झेडपीसाठी हाच हवाय कारभारी

वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर, शिक्षकांसह पैलवानाचा गौरव समारंभ
महावार्ता न्युज:- शिवसेना
पुणे जिल्हा प्रमुख प्रकाश किसन भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाआरोग्य तपासणी शिबीर, अंगणवाडी सेविकाशिक्षिका, आशा वर्कर, तसेच नवोदित पैलवान मंडळींचा सन्मान सोहळा समारंभ शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी शेळकेवाडी (घोटावडे) येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व या महाआरोग्य शिबिर सन्मान सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन भाऊ अहिर हे प्रमुख उपस्थित असणार आहेत. या महाआरोग्य शिबिरामध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशर, फिजिथेरपी, स्त्रीरोग, प्रसूती निदान, बालरोग, नेत्रचिकित्सा, दंत चिकित्सा, तसेच जनरल फिजिशियन अशा विविध आजारावर निदान करण्यात येणार आहे. हिंजवडी येथील समर्थ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिराचे व सन्मान सोहळ्याचे आयोजन माण- हिंजवडी जिल्हा परिषद गट, अखिल घोटावडे गाव शिवसेना शाखा व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश भाऊ भेगडे युथ फाऊंडेशन यांनी संयुक्तरीत्या आयोजन केले आहे.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन आपल्या आजाराचे निदान करून घेण्यात यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी बोलताना प्रकाश भेगडे म्हणाले, परिसरातील मित्र परिवार एकत्रित येऊन त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. यावेळी परिसरातील नवोदित मल्ल यांना विशेष मदत करण्यात आहे. यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा देखील साडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पक्षाच्यावतीने प्रथमच अशा भव्य आयोजन करण्यात येत आहे. प्रकाश भेगडे यांचे उपक्रम लय भारी, जिल्हा परिषदेसाठी हाच हवाय कारभारी असा नारा माण- हिंजवडी जिल्हा परिषद गटात घुमू लागला आहे.
See also  मुळशीचे चित्र बदलण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांतदादा पाटील