



कोल्हापूर विभागाची वार्षिक नियोजन बैठक संपन्न; धर्मजागरण, सेवा व सामाजिक उपक्रमांवर भर – विही प हितचिंतक अभियान यशस्वी करा : भाऊराव कुदळे
कोल्हापूर २८ (राजेंद्र मकोटे)
समाजात सामाजिक मूल्ये, राष्ट्रीय जाणीव आणि सकारात्मक विचारांची जोपासना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आगामी काळात जिल्हाभर व्यापक संपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री व प्रचारक भाऊराव कुदळे यांनी दिली. कोल्हापूर येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या कोल्हापूर विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी व्यासपीठावर /विभाग पालक धनाजी शिंदे, विशेष संपर्क प्रांतमंत्री श्रीकांत पोतनीस जिल्हा अध्यक्ष शांतीभाई लिंबानी जिल्हा मंत्री विनय बारड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. बैठकीत आगामी वर्षातील संघटनात्मक कामकाज, विविध उपक्रमांचे नियोजन तसेच कार्यविस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना भाऊसाहेब कुदळे म्हणाले की, प्रखंडनिहाय मंत्री, सहमंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच दुर्गा वाहिनी, मातृशक्ती आणि बजरंग दल यांच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्या तातडीने पूर्ण कराव्यात. धर्मजागरण, सेवा, आरोग्य, सामाजिक समरसता, संस्कारवर्ग आणि बजरंग दल अशा विविध आयामांमध्ये समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
या बैठकीत धनाजी शिंदे यांनी सर्व प्रखंडांनी ४ जुलैपर्यंत संघटनात्मक नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना केली. त्याचबरोबर प्रत्येक गाव, तालुका आणि प्रखंड स्तरावर नियोजित कार्यक्रम प्रभावीपणे राबवून ते यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा मंत्री विनय बारड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामुदायिक शांतीमंत्र’ म्हणत बैठकीचा समारोप करण्यात आला.
या बैठकीस कोल्हापूर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, वडगाव, पन्हाळा हुपरी तसेच विभागातील विविध तालुक्यांतील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि मातृशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी सह ज्येष्ठ कार्यकर्त दिलीप भिवटे पी एस कुलकर्णी अँड सुधीर जोशी वंदूरकर मातृशक्ती च्या रेवती हणम सागर , अर्चना रानडे जानव्ही पाटील , अश्विनी ढेरे राजेंद्र मकोटे उपस्थित होते. बैठकीत आगामी काळातील सेवा, संघटन विस्तार आणि समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.













