


कोल्हापूर 19
देवभूमी हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट, मौ. जावळी, आंबा घाट, जिल्हा कोल्हापूर तर्फे सांगली चे यशस्वी प्रमोटर किशोर प्रभाकर पटवर्धन यांचेतर्फे आर्किटेक्चर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित डिझाईन स्पर्धेत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
देवभूमी हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट, मौ. जावळी, आंबा घाट, जिल्हा कोल्हापूर येथील मानवनिर्मित (कृत्रिम) धबधबा या विषयावर आधारित या स्पर्धेचा अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. स्पर्धेत महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी दिया दापके व निहाल मुलतानी यांनी प्रथम क्रमांक (गोल्ड) मिळविला. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थी शर्वत हावळ याने द्वितीय क्रमांक (सिल्व्हर) पटकाविला.
स्पर्धेसाठी ज्येष्ठ वास्तुविशारद महाजनी आणि वास्तुविशारद राहूल पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य चिदंबर दुदगीकर आणि चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच आयक्यूएसी समन्वयक प्रा. मनोरमा पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले, या यशा बद्ल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .












