हिंजवडी आयटी पार्कचे सर्व प्रश्न सोडविणार,  हिंजवडी परिसरामध्ये किरण दगडे यांना प्रचंड प्रतिसाद

मुळशी : हिंजवडी आयटी पार्क तसेच परिसराच्या गावांमधून किरण दगडे पाटील यांच्या प्रचारास सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून हिंजवडी तसेच परिसरातील सर्व प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन किरण दगडे पाटील यांनी हिंजवडीकरांना दिले. येथील नागरिकांशी बोलताना ते म्हणाले आयटी पार्क मुळशी तालुक्यात झाले खरे परंतु त्याचा फायदा स्थानिक युवक किंवा मुळशीकरांना किती झाला? हा एक संशोधनाचा विषय आहे या आयटी पार्क मधून शेकडो कोटी रुपयांचा सीएसआर फंड दरवर्षी निघतो परंतु तो मुळशीकरांच्या नशिबी आहे की नाही? हा प्रश्न सध्या सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. त्या आयटी पार्क मधून निघालेला सीएसआर फंड हा खरंतर मुळशी तालुक्यामध्ये वापरून मुळशी तालुक्याचा विकास करणे गरजेचे असताना सुद्धा तेथून निघालेला सीएसआर फंड कुठे कुठे जातो? अशा प्रकारचे अनेक प्रश्न मुळशी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. त्या सीएसआर फंडावर लोकप्रतिनिधी भ्र शब्द बोलायला तयार नाहीत. आयटी पार्क ने मुळशी तालुक्याचा वापर फक्त पैसे कमविण्यासाठीच केला बाकी त्याचा म्हणावा असा फायदा तालुक्याला झालेला नाही त्याचा फायदा कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला झाला? हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे. मला फक्त एक संधी द्या त्या संधीचे रूपांतर भोर विधानसभा मतदार संघाच्या प्रत्येक गावातील विकासामध्ये झालेले असेल हा विश्वास मी तुम्हाला आता देतो. हिंजवडी आयटी पार्क ने मुळशी तालुक्याला जगाच्या नकाशावर नेले परंतु मुळशी तालुका हा जगाच्या नकाशावरून मिटत चाललेला असल्याचे चित्र स्पष्ट सध्या दिसत आहे. आणि यासाठी खासदार सुप्रिया सुळे आमदार संग्राम थोपटे हे जास्त जबाबदार असल्याचे बोलत जोरदार टीका केली. आयटी पार्क मधील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत आमदार संग्राम थोपटे आणि खासदार सुप्रिया सुळे हे गेले पंधरा वर्ष या भागाचे नेतृत्व करीत आहेत परंतु येथील मुख्य समस्या आजही मिटलेल्या नाहीत त्यामुळे या परिसरातील स्थानिक ग्रामस्थांसहित या भागामध्ये राहिला आलेल्या अनेक नागरिकांच्या मनामध्ये यावेळी आपले नेतृत्व बदलायचेच असा निर्धार केलेला दिसतो असे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.
या आयटी पार्क मध्ये जे कामगार काम करण्यासाठी येतात त्यामुळे हिंजवडी माण कडे जाणारे तसेच मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग दररोज वाहतूक कोंडीने जाम असतो आयटी पार्क आणले परंतु त्या साठी लागणाऱ्या सुविधा मात्र आयटी पार्क मध्ये तसेच परिसरामध्ये दिल्या नाहीत.
मान आणि हिंजवडी परिसरामध्ये टोलेजंग इमारती आहेत अनेक बाहेरील नागरिक या ठिकाणी सदनिका घेऊन स्थायिक झालेले आहेत. ज्यांची सोसायटी मोठी आहे त्यांना त्यांच्या सोसायटी कडून गार्डन किंवा इतर सुविधा पुरविला जातात परंतु जे स्थानिक नागरिक आहेत जे पूर्वीपासून त्याच गावात राहतात अशा नागरिकांना कुठल्याही प्रकारची सार्वजनिक बाल उद्यान किंवा त्या मुलांना खेळण्यासाठी लहान मुलांची खेळणी कुठेही उपलब्ध झालेली नाहीत.हिंजवडी येथील आयटी पार्क मधील अनेक कंपन्या येथून निघून गेल्या आहेत त्याबाबत खासदार आणि आमदार भ्र शब्द सुद्धा काढत नाहीत आपल्या मतदार संघातील कंपन्या दुसऱ्या राज्यात जातात त्यावेळी आपले लोकप्रतिनिधी कुठे गायब असतात त्यांच्या अडचणी का सोडविल्या जात नाही .
See also  राजयोगी सूरज भाईंच्या सकारात्मक विचाराने पुणेकर मंत्रमुग्ध