


मुठा खोऱ्यातील मुलींच्या शिक्षणासाठी बसचे लोकार्पण
महावार्ता न्युज: मुळशी हा समृद्ध तालुका असून तालुक्याचे रंगवले जाणारे चित्र अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी महिलांना आर्थिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे खोऱ्यातील महिलांनी एकत्रित येऊन एखादा उद्योग सुरु केल्यास त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.













