हिंजवडी, माण, मारूंजीतील ग्रामस्थांच्या लढ्याला मिळाले यश, मारूंजी गावठाण रस्ताही 24 मीटर
प्रा. संजय दुधाणे, संपादक
महावार्ता न्यूज: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हददीमधील हिंजवडी, माण, मारुंजी भागातील प्राधिकरणाच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाखालील बाधित क्षेत्राच्या मालकांना टीडीआर देण्यात येणार आहे. यापूर्वी हिंजवडीतील शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते. आता मारूंजी व माणमधील बाधित जमीन मालकांनाही टिडीआर दिला जाईल असे पीएमआरडीए आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी जाहिर केले आहे.
हिंजवडी, माण प्रमाणेच मारूंजी गावठाण रस्ता 36 ऐवजी 24 मीटर करण्यात येईल असे आश्वासन पीएमआरडीए आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी ग्रामस्थांना दिले आहे. पेट्रोल पंप ते प्राथमिक शाळा असा 800 मीटर रस्ता 24 मीटरचा असेल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक शिवाजीराव बुचडे यांनी सांगितले आहे.
प्रस्तावित रुंदीकरणाखालील बाधित जमीनधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ व विकास नियंत्रण नियमावली नुसार अनुज्ञेय टिडीआर मंजुर करण्यात येणार आहे. ते 6 रस्ते पुढीलप्रमाणे
१. पांडव नगर ते माण गावठाण ते फेज-३ राज्य महामार्गक्र.१३० (टी जंक्शन) २. लक्ष्मी चौक ते पदमभुषण चौक ते विप्रो विकास -योजना रस्ता सर्कल ३. मॅझेनाईन ते लक्ष्मी चौक – राज्य महामार्ग क्र.१३० ४. लक्ष्मी चौक ते मारुंजी – राज्य महामार्ग क्र.१३० ५ – शिंदे वस्ती ते जगताप चौक (कासारसाई | विकास योजना रस्ता रोड) ६. मधुबन हॉटेल ते शिवाजी चौक – प्रमुख जिल्हा मार्ग क्र.१५२
टिडीआर नको, रिंग रोड प्रमाणे मोबदला पाहिजे शेतकर्यांची मागणी
पीएमआरडीएच्या निर्णयाचे मारूंजीतील प्रगतीशील शेतकरी किसन दिसले यांनी स्वागत केले आहे. दिसले हे म्हणाले की, रस्ता रूंदीकरणाला आमचा विरोध नव्हता. मूळ शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे, ही आमची मागणी होती. रस्ता रुंदीकरणात 80 च्या दशकात आमची 49 गुंठे जमीन गेली. त्याचा काहीच मोबदला मिळाला नाही.आता पीएमआरडीएचा विकास आराखडा मंजुर नाही. तर टिडीआर कसा देणार, आम्हाला रिंग रोड प्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे.