थेट दुबईतून संजय दुधाणे…- पाटा खेळपट्टीवर भारत-पाक हायहोल्टज थरार काही तासात रंगणार 

थेट दुबईतून संजय दुधाणे…-

 

भारतात पाकिस्तान लढतींवर बहिष्कार सुरू असताना दुबई नगरी हायहोल्टेज लढतीसाठी सज्ज झाली आहे. 40 अंश सेल्सियस तापमानात सुरू होणाऱ्या महामुकाबल्यासाठी क्रिकेट शौकिनांना उत्साह थंड आहे.

 भेगाळलेल्या खेळपट्टीवर यूएईला हरवून भारताने विजयाची गुढी उभारली होती. पाकिस्तान विरूध्द 3 पैकी पाटा खेळपट्टीवर थरार रंगणार आहे. ना भेगा, ना गवत असलेले ही फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी सज्‍ज झाली आहे. धावांचा पाऊसांवर पर्वणी आशिया करंडक स्‍पर्धेत प्रथमच रविवारी अनुभवता येणार आहे. नाणेफेकी सारं काही अवलंबून असेल. भारताने प्रथम फलदांजी घेतली तर २०० पेक्षा अधिक धावांचा पैसा वसूल करणारा खेळाचा आनंद क्रिकेटशौकिन लुटतील. ४० अंश तापमान असले तरी भारतीय संघ वातावरणाशी एकरूप झाला आहे. ४ फलदांज, ३ गोलंदाज व ३ अष्टपैलू खेळाडू ही रणनीतीने सुपर फोरचा पल्‍ला सर्वप्रथम गाठण्यासाठी टीम इंडिया सज्‍ज झाली आहे.

मध्य दुबई पासून तब्बल 27 कि.मी अंतरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वसले आहे. २१ किमी मेट्रो प्रवासानंतर 6 कि.मी बसचा प्रवास करून करीत मी आयसीसी अकॅडेमीचे मैदान गाठले. तळपत्या उन्हात भारतीय संघाचे सराव सत्र रंगले होते. कर्णधार सुर्यकुमार यादवसह सारा टीम इंडिया सरावात मग्न होती.
लढतीच्‍या पूर्वसंध्येला दोन्‍ही संघांच्‍या पत्रकार परिषदेची परंपरा आहे. शक्‍यतो कर्णधार अथवा मुख्य प्रशिक्षक पत्रकार परिषदेला हजेरी लावतो. पाकिस्‍तानविरूध्दच्‍या महा मुकाबल्‍यासाठी रायन टेन डोइशे पत्रकार परिषदेसाठी आले तेव्‍हा साऱ्यांचाच भोवया उंचवल्‍या. भारताच्‍या पत्रकार परिषदेसाठी नेदरलँडचा माजी फलंदाज व भारताचा सहाय्यक प्रशिक्षक रायनने हजेरी लावली. गौतम गंभीरने जे सांगितले तीच उत्तरे देत होता. कोणाविरूध्द लढत आहे त्‍यापेक्षा मैदानात काय सुरू आहे याकडे पूर्ण लक्ष दया हे गौतम गंभीरचा निरोपही देण्यास रायन विसरले नाही.
भारत-पाक लढत म्‍हणजे उत्‍साहाचे उधाण उसळते. चाहत्‍यांची गर्दीने स्‍टेडियमचा परिसर फुलून गेलेला असतो. दुबई स्‍टेडियमच्‍या परिसरात सारे काही सुने सुने होते. हाताच्‍या बोटावर मोजण्याइतकेही चाहते आयसीसी अकॅडेमी परिसरात दिसले नाही. चॅम्‍पियन्‍स करंडकावेळी जे क्रिकेटमय चैतन्‍य होते, तसे काहीच नव्‍हते. शनिवारी तिकिट विक्रीलाही थंड प्रतिसाद होता. खचाखच भरलेले स्‍टेडियमविना सुपर संडेची भारत-पाकसाठी दुबई सजले आहे. 
See also  राष्ट्रीय स्पर्धेत मुळशीच्या आयुषा इंगवलेला कांस्य पदक, सलग पाचव्यांदा गाजवली राष्ट्रीय स्पर्धा