पहिल्या 10 भाग्यवान विजेत्या जोडप्यांना विमानाने काशी दर्शन बक्षीस
महावार्ता न्यूज : आध्यात्मिक वारसा असलेल्या मुळशीतील युवा नेते मिलिंद नंदकुमार वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात पहिल्यादांच खेळ रंगला वारकऱ्यांचा सोहळा रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्या 10 भाग्यवान विजेत्या जोडप्यांना विमानाने काशी दर्शन बक्षीस दिले जाणार आहे.
रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 02 वाजेपर्यंत सूस मधील सनीज वर्ल्डमध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम रंगणार आहे.
कार्यक्रमास आलेल्या सर्व वारकऱ्यांना आकर्षक भेटवस्तू प्रथम क्रमांकास स्मार्ट फोन, द्वितीय क्रमांकास 32 इंच LED TV, तृतीय क्रमांक स्पीकर तर 10 उत्तेजनार्थ मिक्सर पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक मिलिंददादा नंदकुमार वाळंज यांनी दिली आहे.
मिलिंददादा नंदकुमार वाळंज यांना मुळशीतून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उपक्रमाची चर्चा राज्यात रंगली आहे.