मुळशीत शंकरभाऊंकडून इच्‍छुकांच्‍या मॅरेथान मुलाखती- मिलिंद वाळंज यांचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन, संग्रामदादांचे इनकमिंग धक्‍कानाट्य-राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपात

महावार्ता न्‍यूज ः   भाऊबीजच्‍या मुहुर्तावर मुळशीत आगामी जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणुकीचे रणधुमाळीचे आतषबाजी दिसून आली.  मुळशीतील जनतेचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी संवाद मेळावा घेत थेट राष्ट्रवादी पक्षाच्‍या इच्‍छुक उमेदवारींच्‍या  मॅरेथान मुलाखती घेतल्‍यर तर  याच दिवशी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्‍या उपस्‍थितीत राष्ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांनी  भाजपात प्रवेश करीत इनकमिंग धक्‍कातंत्रचे फटाके फोडले.
          घोटावडे फाटा येथील राष्ट्रवादी अजीत पवार गटाच्‍या  मेळाव्‍याला मोठा प्रतिसाद दिसून आला. ३ जिल्‍हा परिषद व ६ पंचायत समितीच्‍या निवडणुकीसाठी इच्‍छुकांची मांदियाळी विमल गार्डनमध्ये पहाण्यास मिळाली. आमदार शंकर मांडेकर, पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, नेते शांतराम इंगवले, तालुकाअध्यक्ष अंकुश मोरे, नंदूकुमार वाळंज, कात्रजचे संचालक कालिदास गोपालघरे, बाबाजी शेळके यांच्‍यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्‍थित होते.
   राष्ट्रवादीचा मुळशीतील मेळावा संपल्‍यानंतर संध्याकाळी   राष्ट्रवादी पक्षाचे मुळशी तालुका कार्याध्यक्ष आनंदा नारायण घोगरे यांनी आपल्या कार्याध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्‍याची चर्चा सुरू झाली, तोच माजी आमदार संग्राम थोपटे यांच्‍या उपस्‍थितीत भोरमधील कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी सभापती पाडूरंग ओझरकर, सुरेश हुलावळे, दादा मांडेकर, गंगाराम मोतेरे, अमित कंधारे, शिवाजी बुचडे उपस्‍थित होते. अंतर्गत गटबाजीमुळे ते नाराज होऊन त्‍यांनी प्रवेश केला आहे.
मिलिंद वाळंज यांचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन
राष्ट्रवादीच्‍या मेळाव्‍यात इच्‍छुकांच्‍या मुलाखतीत मिलिंद वाळंज यांचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले. त्‍याचे शक्‍तीप्रदर्शन लक्षवेधी ठरले. रॅली काढत मिलिंद वाळंज यांनी आपली प्रबळ दावेदारी दाखवून दिली. नवीन मुळशीचा इतिहास रचण्यासाठी माझ्यासारख्या शिलेदाराला बरोबर घ्या. असे आवाहन वाळंज यांनी केले. 
      
         एकीकडे राष्ट्र्रवादीत इच्‍छुकाची संख्या मोठी असल्‍याने तिकिट नेमके कोणाला दयावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उमेदवारच नसल्‍याने माजी आमदार संग्राम संग्राम यांच्‍या दिवाळीत ३ बैठका झाल्‍या. भोरमधूनही आपला कारभार माजी  आमदार थोपटे करीत असल्‍याने भोरची वारी मुळशीतील पक्षबदल केलेले नेते करीत आहे. प्रवेश नाट्यही भोरमध्ये होत असल्‍याने राष्ट्रवादी अजीत पवार गट सुसाट, भाजपा अजूनही कोमात असल्‍याचे चित्र मुळशीत दिवाळीच्‍या पर्वात प्रकटले आहे.
See also  विजयासह भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल, थरारक सामन्यात श्रीलंकेवर मात