बारामती तुपाशी अन् मुळशी उपाशी? मुळशीकरांचे ठरले उमेदवारांना नो वोट, ओन्ली नोटा

नमस्कार…मी अजीत पवार बोलतोय,

मुळशीकरांना एकाच दिवशी सुळे, पवारांचा थेट फोन 

महावार्ता न्यूज ः गेल्या 3 दशकात जे शक्य झाले नाही ते  मुळशीत आज घडले. दस्तुरखुद्द अर्थमंत्री, पालकमंत्री अजीत पवार यांना फोन मुळशीतील गावोगावात वाजला. नमस्कार… मी अजीत पवार बोलतोय हे शब्द ऐेकू येत होते. आमच्या अशिक्षित शेतकर्‍यांना वाटले की खरंच दादांनी मला फोन केला. बिचार्‍या शेतकर्‍यांने दादा नमस्कारही म्हटले, काहींनी रामकृष्णहरीनेही प्रतिसाद दिला. दादा केवळ घड्याळाला मत दया म्हणाले आणि फोन बंद झाला. 
दादानां फोन संपताच अर्धा एक तासांनी सुनेत्रा अजितदादा पवार यांना फोन आला, संध्याकाळी 5 नंतर सुप्रियाताईं सुळे यांनी देखिल फोन केला. 3 क्रमांकाच्या तुतारीला मत दया यापलीकडे ताई पलीकडून काहीच बोलल्या नाही. अनेक मुळशीकरांच्या मनी प्रश्न आला की आजच का मला ध्वनीमुद्रित फोन केला. यापूर्वी कधीच विचारपूसही झाली नाही. 

अजीत पवार असो वा सुप्रियाताई हे केवळ मुळशीतील गाव पुढार्‍यांना फोन करत असतात. कधी त्यांनी कष्टकरी शेतकर्‍यांची भेट घेतली नाही. विकास सोसायट्या, दूध संघ, जिल्हा बँक यापलीकडेच मुळशीतील जग त्याना ठाऊक नाही. मुळशी किती पदवीधर होतात, किती स्पर्धा परिक्षेत उत्तिर्ण होतात, किता लेखक आहेत, किती खेळाडू आहेत याची कधीच चर्चा दाद, ताईंनी केली नाही. विकासकामाच्या अहवालात बारामतीची 40 टक्के पाने आणि मुळशीची चारही नाही.  बारामती आणि बारामतीचे उमेदवार या भोवतीच लोकसभा निवडणुक फिरत आहे. मुळशीला काय नव्या योजना देणार याबाबत कोणीच सभेत बोलत नाही   बारामती तुपाशी अन् मुळशी उपाशी असे चित्र आता नव्या उमेदीच्या मतदारांनी ओळखले आहे, म्हणूनच ना घड्याळ, ना तुतारी असे निश्चय अनेक मुळशीकर मतदारांनी घेतला आहे. अनेकांनी नोटा मतदान करण्याचा  प्लॅन केला आहे. कारण की…..

1. कमळाचे चिन्ह नाही
2. आय टी पार्क आले पण स्थानिकांना रोजगार नाही
3. पुणे-कोलाड महामार्गवर गेलेले 18 बळी 
4. विकासाच्या मुद्दा सोडून केवळ एकमेेकांवर टिकास्त्र
5. मुळशीत एकही उद्यान नाही
6. स्पर्धा परिक्षा केंद्र नाही
7. बारावीनंतरच्या स्पर्धात्मक परिक्षेचे मार्गदर्शनाचा अभाव
8. उच्च दर्जाच्या पदवी व पदवीत्तर शिक्षणसंस्थेचा अभाव 
9. क्रीडासंकुल नाही, प्रशिक्षक नाहीत 
10. वाढती गुन्हेगारी, छुपा मुळशी पॅटर्न 

मुळशीत हवा कोणाची ? तुतारी की घड्याळ, नोटा की नो वोट – बारामती लोकसभा मतदारसंघ, महावार्ता गाऊंड झिरो रिपोर्ट 1

See also  पेरीविंकलच्या विज्ञान नगरीत घडतील अनेक भावी शास्त्रज्ञ!!!