प्रचारात मिलिंद वाळंजची मोठी आघाडी, गावभेटीत घरोघरी राष्ट्रवादी पुन्हाचा निर्धार

परिवर्तन घडविणार, पौड-अंबडवेट गटात मतदारांची ललकार
पौड ः  मुळशीची राजधनी असणाऱ्या पौड गावाचा समावेश असलेल्या पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मिलिंद नंदकुमार वाळंज यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या निधनानंतर साधेपणोने प्रचार सुरू असताना गावभेटीत घरोघरी राष्ट्रवादी पुन्हाचा निर्धार मतदारांनी केला आहे. 
तालुक्यात सर्वाधिक 72 मतदान केंद्र असलेल्या सर्वच गावात अभ्यासू उमेदवार मिलिंद वाळंज यांनी गावभेट दौरा पूर्ण केला आहे. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत   मिलिंद नंदकुमार (बाबूजी) वाळंज व पौड पंचायत समितीच्या उमेदवार काजल अंकुश मोरे यांनी आज अकोले, शेरे, जामगाव, दिसली, माले, वळणे, सोनारवाडी (वळणेवाडी), नानिवली, नांदिवली, वडवाथर, शेडाणी, दत्तवाडी, महाळुंगेवाडी, चांदिवली, शिरवली, पोमगावसह मुळशी धरण परिसरात दौरा केला. यावेळी महिला, तरूण व स्थानिक शेतकऱ्यांनी मोठी प्रतिसाद दिला. 
पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील उमेदवार अंबडवेट गणातही मिलिंद नंदकुमार वाळंज व पंचायत समिती अंबडवेट गणाचे अधिकृत उमेदवार प्रविण  धनवे यांच्या प्रचार दौऱ्याना मतदारसंघातून अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला. अंबडवेट, भरे व दारवली नंतर आसदे, कोळवण खोऱ्यात मिलिंद नंदकुमार वाळंज यांचे मतदारांनी जंगी स्वागत करण्यात आले. 
भोर-मुळशी विधानसभा मतदारा संघात जी परिवर्तन आम्ही घडवले, तेच पुन्हा कार्यतत्पर उमेदवार मिलिंद वाळंज यांना निवडून आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीत घडविणार अशी ललकार पौड-अंबडवेट गटात घुमत आहे. या गटात राष्ट्रवादीला प्रचारात पहिल्या दिवसापासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. असतानाही गावभेटी दौऱ्यात राष्ट्रवादीला पाठिंबा दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांना श्रध्दांजली म्हणून राष्ट्रवादीला मत देणार असल्याची चर्चा मुळशी धरण भागात सुरू झाली आहे. 
वाळंज यांनी पदयात्रा व कौटुंबिक भेटींच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला. वाळंज यांनी भरीव कामगिरीच्या जोरावर निवडणुकीत स्पष्ट आघाडी घेतली आहे.  केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचा हिशेब देत वाळंज यांनी मतदारांची मने जिंकली असल्याचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.  वाळंज यांचा विजय होणारच अशी चर्चा गावागावात रंगू लागली असून संपूर्ण वाळंत कुंटुंब प्रचारात सक्रीय झाले आहे. 
मिलिंद वाळंज यांनी पदयात्रा व कौटुंबिक भेटींच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी रामचंद्र गोपाळघरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सांगितले की, आमदारकीला शंकर मांडेकर यांना आम्ही निवडून दिले. आता राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे आपण कार्यशील उमेदवार आहे. आमचं फिक्स ठरलयं विधानसभेत शंकरभाऊ, झेपीत मिलिंद दादा.
आमदार शंकर मांडेकर यांनी पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटासाठी मोठा निधी आणला आहे. तर विकास करायचा झाल्यास सत्तेत असणाऱ्या पक्षाचाच आमदार, जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिले असे सांगून कोळवण खोऱ्यतील शिवप्रेमी राजेंद्र साठे म्हणाले की, दोन वेळा आम्ही चुक केली. आता ती होणार नाही. जसे शंकरभाऊला आम्ही आपला माणूस म्हणून मत दिले तसेच आता कामाचा माणूस असल्याने मिलिंद दादांना आम्ही समर्थ साथ देणार आहे
See also  महाराष्ट्राला १४ वर्षांनी सांघिक जिम्‍नॅास्टिक्समध्ये यश, ज्युनियरमध्ये एक सुवर्णासह रौप्य, सिनियरमध्ये कांस्य