पौड पोलीसांकडून शासकीय कार्यालयासह एसटी स्टँड परिसर चकाचक , गुन्हेगारांची सफाई करणार्‍या हातात दिसला झाडू

महावार्ता न्यूज ः गांधीजयंतीनिमित्त देशभर सुरू असलेल्या एक तास स्वच्छता मोहिमेत मुळशीत सर्वप्रथम पौड पोलिसांनी पुढाकार घेतला. गुन्हेगारांची सफाई करणार्‍या हातात झाडू दिसल्यामुळे नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

शासनाच्या एक तास श्रमदानातून स्वच्छता अंतगर्त पौड परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता मोहिमेत तहसीलदार मिसाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोजकुमार यादव,  पौडचे सरपंच प्रमोद शेलार व सदस्य ग्रामपंचायत पौड , पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील,महिला दक्षता कमिटी पौड पोलीस स्टेशन, तसेच तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अभियानात पोलीस स्टेशन परिसर, तहसीलदार कार्यालय परिसर, पंचायत समिती कार्यालय, शासकीय दवाखाना, एस टी स्टॅड परीसरामध्ये स्वच्छता करण्यात आली आहे.

 

See also  शंकरभाऊ आमदार झाल्याचे झळकले फ्लेक्स, भोरमधील 74 टक्के विक्रमी मते ठरविणार नवा आमदार