जनसेवा सहकारी बँकच्या पिरंगुट शाखेचे नविन जागेत स्थलांतर.

पुणे : जनसेवा सहकारी बँक लि.हडपसर पुणे बँकेच्या पिरंगुट शाखेचे स्थलांतर  गट नं.79/2 दुकान 1 ते 3 गिरीजा हाईट्स पौड रोड पिरंगुट कॅम्प, लवळे फाट्याजवळ, पिरंगुट ता.मुळशी जि.पुणे या वास्तूत झाले. सदर नविन जागेतील शाखेचे उदघाटन बँकेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.राजेंद्र गुरुपादया हिरेमठ व बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री.रवि शंकर तुपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यात बँकेचे सर्व मा.संचालक मंडळ सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.शिरीष पोळेकर, बँकेचे सरव्यवस्थापक मा.श्री.हेमंत वराडपांडे, शाखा व्यवस्थापक श्री.दिपक दुधाणे व बँकेच इतर सेवक वृंद उपस्थित होते. तसेच बँकेचे सभासद , खातेदार व हितचिंतक उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी श्री.चौंधे कैलास (संघचालक मुळशी तालूका), श्री. कुदळे वैभव  (कार्यवाह, मुळशी तालूका), पिरंगुट गावचे सरपंच श्री.वैभव पवळे, उपसरपंच श्री.राहूल पवळे, श्री.चौंधे अनिल (संयोजक धर्म जागरण, पुणे जिल्हा), श्री.लांडे सिताराम (जागा मालक), श्री.किरण दगडेपाटील (मा.नगरसेवक, भोर विधानसभा भाजपा), श्री.राजाभाऊ वाघ (अध्यक्ष, भाजपा मुळशी तालुका), श्री.मोहन गोळे (माजी सरपंच, पिरंगुट)  श्री.संजय दुधाणे (पत्रकार, महावार्ता न्युज/ टि.व्ही 9) आदि मान्यवर उपस्थित राहुन बँकेच्या भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
उदघाटन प्रसंगी बँकेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.राजेंद्र हिरेमठ यांनी बँकेने पिरंगुट गावातील लोकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने पिरंगुट मध्ये मध्यवर्ती ठिकाणी शाखेचे नवीन जागेत स्थलांतर केले आहे तसेच नविन शाखेची अंतर्गतरचना हि आधुनिक काळाला सुसंगत असल्याची माहिती दिली. नविन शाखेत ग्राहकांकरीता ए.टी.एम., सुसज्ज पार्किंग तसेच नव्याने लॉकरची सुविधा उपलब्ध करुन दिले आहे त्याचा सर्व  ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. मा.अध्यक्षांनी व सर्व मा.संचालक मंडळ सदस्यांनी उपस्थित सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक यांचेशी संवाद साधुन बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. तसेच मा.उपाध्यक्ष श्री.रवि तुपे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, सभासद, खातेदार आणि हितचिंतक यांचे कार्यक्रमात उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल आभार मानले.
See also  मुंबईत अवतरला सर्वात उंच लाकडी गजराज, सुबोध मेननांच्या  विक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद