महावार्ता न्यूज: पौड येथिल दुय्यम निबंधक 1 मुळशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चुकीचा फलक लावल्यामुळे सर्वसामान्यांची मोठी दिशाभूल होत आहे. चुकीला मेलआयडी फलकावर दिला असून फोन नंबर गायब करण्यात आला आहे.
पुणे येथिल मुद्राक जिल्हाधिकारी कार्यालयात मेल का मिळत नाही याची विचारणा केल्यानंतर हा मेल आयडी पुणे शहरातील कार्यालयाचा असल्याचे समजून आले. ग्रामिण भागातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा मेल आयडी न दिल्यामुळे व फोन नंबर न लिहिल्यामुळे चुकीच्या दस्तनोदणी बाबत तक्रार निवारणबाबात दिशाभूल होत आहे.
दुय्यम निबंधक क्षीरसागर यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती झाल्यापासून हा चुकीचा फलक लावण्यात आला होता. यामुळे अनेकांची दिशाभूल झाली असल्याचे दिसून आले आहे. आता हा चुकीच्या माहितीचा फलक कधी बदलणार याबाबत चर्चा रंगली आहे.