महावार्ता न्यूज ः हिंजवडीतील तुळजाभवानी मंदिरात भक्तीमय उत्साहात नवारात्र उत्सव साजरा होत असून परिसरातील आय टी कंपनीच्या अभियंतेची मोठी गर्दी होत आहे. 23 वर्षांपासून शेतकरी कुटुंबातील पांडुरंग ज्ञानोबा वाघेरे यांनी भव्य मंदिर उभे करून त्यांचे कुटुंब देवीचा मनोभावे सेवा करीत आहेत.
2001 पासून अनेक आय.टी. अभियंते मंदिरात नियमीत येत असून नवरात्रीच्या काळात संध्याकाळी या मंदिराच्या परिसरात भक्तीमय वातावरणाचा अनुभव येत आहे. अनेक संगणकतंज्ञ नाराळाचे तोरणेही अर्पण करतना दिसत असून आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिराची शोभाही लक्ष वेधून घेत आहे.
22 वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या आयटी नगरी हिंजवडीतील प्रति तुळजापूर असे संबोधल्या जाणार्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला देखील महाराष्ट्राच्या कांना कोपर्यातून भाविक येऊन नवस फेडतात. हिंजवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह खर्या अर्थाने हिंजवडीतील उच्चभ्रू आयटीयन्स कुटुंबीयांची इच्छापूर्ती करणारी देवी अशी ख्याती देवीची आहेत्