दुधानवाडी काळूबाई देवीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले दर्शन, मार्गशिर्ष महिन्यानिमित्त देवीला फुलांची सजावट  

महावार्ता न्यूज: ( संपादक- संजय दुधाणे) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी -एनडीएतील दुधानवाडीतील काळूबाई मंदिरातील मार्गशिर्ष महिन्यातील उत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला.  खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच काळूबाई देवीचे दर्शन घेत मंदिर परिसराला भेट दिली.
दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यात राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी एनडीएतील दुधानवाडीतील काळूबाई मंदिरात देवीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा या उत्सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी देवीचा अभिषेक, होमहवन, देवीच्या मंदिराबाहेरील मारूती, गणेश व रामजी दुधाणे यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. उत्तमनगर, शिवणे, वारजे, माळवाडी, धावडे, अहिरे व मुळशी तालुक्यातील देवीभक्तांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. महाप्रसादाचाही शेकडो भक्तांना आस्वाद घेतला.

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएसाठी 1948 मध्ये देश स्वातंत्र्य होताच  दुधाणे घराण्याच्या पूर्वजांनी वडिलोपार्जित जमीन, घरदार राष्ट्राला  एनडीए उभारणीसाठी अर्पित केले. खडकवासला जवळील दुधानवाडीतील 21 एकर जमीन  रामजी दुधाणे  यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी दान केली होती. रामजी दुधाणे यांनी काळूबाई मंदिराची अनेक वर्ष मनोभावे पूजा केली होती.  त्याची मूर्तीचे छोटे मंदिरही बांधण्यात आले आहे.  नवरात्रीत देवीचे घट बसविण्याचा मान दुधाणे घराणेकडे आहे.

एनडीएची स्थापना होण्यापूर्वीच दुधानवाडी 23 एप्रिल 1947 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले होते. यामुळे सुरूवातीपासून राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी एनडीएने मंदिराच्या कार्यक्रमाला साथ दिली आहे. मार्गशिर्ष महिन्यातील उत्सवात एनडीएतील अनेक अधिकार्‍यांनी सपत्नीक देवीचे दर्शन घेतले. पाण्यचा टँकरही एनडीएकडून देण्यात आला होता. एनडीए गेटपासून बसही सोय उत्तमनगर ग्रामस्थांकडून असल्याने शेकडेा भाविकांना देवी दर्शनाचा लाभ मिळाला.
See also  भोर विधानसभेत राष्ट्रवादी अजीत पवार गटात धाकधुक, काँग्रेसमध्येही धकधक