अंकुश मोरे यांच्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडीचे जिल्ह्यात होतयं स्वागत

महावार्ता न्यूज: मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या अध्यक्षपदी अंकुश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ.प.गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मोरे यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीने जिल्ह्यात स्वागत होत आहे.
मोरे हे मुळशी धरण भागातील निवे गावचे सरपंच असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांनी यापूर्वी कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
आगामी निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास अंकुश मोरे यांनी महावार्ताशी बोलताना व्यक्त केला. 
कोरोनाच्या काळखंडामध्ये नागरिकांना लस देण्यासाठी वाहने उपलब्ध करून देणे,शेडाणी येथे अतिवृष्टीने दळणवळणाचा पूल वाहून गेल्यानंतर तो बांधून देत मदत करणे तसेच धरण भागातील विद्यार्थ्यांना वहीवाटप व इतर साहित्याचे वाटप करणे या सारखे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . या प्रसंगी ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे,चंद्रकांत भिंगारे,माजी सभापती कोमल वाशिवले,चंदा केदारी,भगवान नाकती,विनोद कंधारे,अनंता कंधारे,विजय कानगुडे,विजय येनपुरे, उपसरपंच नंदु शिंदे आदी उपस्थित होते.
See also  शंकरभाऊ आमदार झाल्याचे झळकले फ्लेक्स, भोरमधील 74 टक्के विक्रमी मते ठरविणार नवा आमदार