


बहिणीचे नाव सातबाऱ्यात असताना केले बेकायदेशीर खरेदीखत,
राठी बिल्डर्सची बेकायदेशीर जमीन खरेदी
महावार्ता न्यूज ः मुळशी पॅटर्न चित्रपटासारखे अजून एक जमीन खरेदी घोटाळा पिरंगुटमध्ये उघडकीस आला आहे. पिरंगुट हद्दीतील गट. क्रं. 159 मधील 62 गुंठ्यापैकी 15.5 गुंठे जमीन सखुबाई मोरू दुधाणे असताना शिल्प इस्टेटच्या कांतीलाल मावजी पटेल, नितीन शंभुलाल पटेल, जयंतीलाल मावजी पटेल यांनी बेकायदेशीर खरेदीखत नोंदवले आहे. याबाबत पौड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल झाला असून तपास सुरू झाला आहे.
पिरंगुट गट. क्रं. 159 मध्ये जमीनीबाबत अप्पर जिल्हाधिकारी कार्यलयात दावा सुरू असताना दुधाणे यांच्या वारसांना पूर्णपणे अंधारात ठेवून शिल्प इस्टेटने मौजे पिरंगुट हद्दीतील गट. क्रं. 159 मधील सर्वच्या सर्व 62 गुंठे जमीन विकली आहे. दुय्यम निबंधक मुळशी, पौडमधील कार्यालयात दस्त क्रमांक 8029/2025 नोंदवून आपल्या हद्दीत हा गुन्हा शिल्प इस्टेटच्या कांतीलाल मावजी पटेल, नितीन शंभुलाल पटेल, जयंतीलाल मावजी पटेल व दुय्यम निबंधक एम व्ही क्षीरसागर यांच्या संगमतीने फसवूणकीचा गुन्हा केल्याची तक्रार नोंदिविण्यात आली आहे.














